ई टेंडरिंग घोटाळ्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ई टेंडरिंग घोटाळ्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.

Share This
मुंबई :  मुंबई महानगर पालिकेत झालेला ई टेंडरिंग घोटाळ्याचे पडसाद आज स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. सभागृह नेत्या तृष्णा विश्वास राव यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत मांडलेल्या झटपट तहकुबीला सर्वपक्षीय गटनेत्यांनी समर्थन दिले. तसेच या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली. 

या मागणीला अनुसरून स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी यावर बोलताना या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेले उपयुक्त वसंत प्रभू हे आयटी विभागाचेही प्रमुख आहेत , त्यामुळे याची नि:पक्ष चौकशी होईल का याबाबत शंका उपस्थित करत या चौकशी समितीत विरोधी पक्ष नेता तसेच सभागृह नेत्याना घेण्यात यावे आणि १५ द्दिवसात अहवाल स्थायी समितीत सादर करावा, असे आदेश दिले आहेत.      

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages