महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये धनगर व तत्सम जातीला आरक्षणाला हिंसक वळण लागणे हे मोठे राजकीय षडयंत्र असल्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे या षडयंत्राची चौकशी करावी अशी मागणी जनहित याचीका दाखल करून करणार असल्याचे राष्ट्रीय देश बचाव पार्टीचे हेमंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
महाराष्ट्र राज्यातील समाजांतील विषमता व त्या मधून निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्था हि एक चिंतेची बाब आहे.धनगर व तत्सम जातीच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे करूनकाही प्रस्थापित पक्ष आगामी निवडणुकीच् या पार्श्वभूमीवर चिघळत ठेवण्याचा प्रयत्न करतआहेत.धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा रास्त असून भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने योग्य आहे.परंतू कायद्याच् या चौकटी मध्ये राहूनहि मागणी पूर्ण व्हावी असे पाटील यांनी सांगितले.
धनगर समाजाला आज पर्यंत राजकीय सत्तेत स्थान दिले गेले नाही यामुळे शैक्षणिक आणि आर्थिक गुनावात्त वाढीसाठी आरक्षण जरुरी आहे. हे आरक्षण मिळावे या मागणीला राष्ट्रीय देश बचाव पार्टीचे समर्थन आहे. इतर जातींच्या आरक्षणाला धक्का न पोहोचवता धनगर समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी राज् यसरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी करतानाच पक्ष द्वारे सरकारकडे पाठपुरावा सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले.