मुंबईत रेल्वेचे स्वच्छता अभियान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत रेल्वेचे स्वच्छता अभियान

Share This
मुंबई - महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्‍टोबरला रेल्वे परिसर स्वच्छता अभियान मुंबईत राबविण्यात येणार आहे. नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी विशेष लघुपट तयार करण्यात आला आहे. या दिवशी रेल्वेस्थानकांवर 126 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. सीएसटी, दादर, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, पनवेल, इगतपुरी आणि लोणावळा या अकरा प्रमुख स्थानकांवर या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी दोन पाळ्यांमध्ये 22 वरिष्ठ अधिकारी तैनात असतील. मुंबई विभागातील 69 इतर रेल्वेस्थानकांवर 126 अधिकारी नेमले आहेत. स्थानक परिसरात घाण करणाऱ्यांना दंड ठोठावण्याचे निर्देश तिकीट तपासणीसांना दिले आहेत. रेल्वे वसाहतींमध्ये सहा पर्सनल ऑफिसर, इंजिनिअरिंगचे सहा अधिकारी व सहा आरोग्य अधिकाऱ्यांवर स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages