एमएमआरडीएतर्फे मानखुर्दला अद्ययावत रुग्णालय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एमएमआरडीएतर्फे मानखुर्दला अद्ययावत रुग्णालय

Share This
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अत्याधुनिक सोयीसुविधांनी युकत असे ३00 खाटांचे सात मजली रुग्णालय मानखुर्द भागात उभारण्यात येत आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागासह प्रसूतीगृहाचा समावेश असून मे २0१५ पर्यंत हे रुग्णालय बांधून पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. रुग्णालयाचे तळघर आणि चार मजल्यांपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. 

मानखुर्द येथे लल्लूभाई कंपाऊंड परिसरात हे रुग्णालय उभारले जात असून ते प्राधिकरणाच्या पुनर्वसन वसाहतीमध्ये आहे. या परिसराची गरज लक्षात घेऊन २0१३मध्ये अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा निर्णय महानगर आयुक्तांनी घेतला आणि जून २0१३मध्ये रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली, अशी माहिती प्राधिकरणाचे उपमहानगर आयुक्त अनिल वानखेडे यांनी दिली. प्राधिकरणाने यापूर्वीच मानखुर्द पोलीस स्थानक बांधून दिल्यामुळे मुंबई पोलिसांची मोठी सोय झाली असून परिसरातील रहिवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मानखुर्दच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्राधिकरण कटिबद्ध आहे. रुग्णालय मे २0१५पर्यंत पूर्ण कार्यरत झाल्यानंतर ते बृहन्मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातल रहिवाशांना मोठा फायदा मिळेल, अशी प्राधिकरणाला खात्री असल्याचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages