पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सामुहिक राजीनामे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सामुहिक राजीनामे

Share This
मुंबई - महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असतानाच काँग्रेस पक्षाचा घटक पक्ष असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पक्षातील असंतोष उफाळून आला आहे . पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून या  पक्षातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीआपल्या  पदाचे सामुहिक राजीनामे आज  दिले . पक्षाची विस्कळीत घडी,कार्यकारिणीची पुनर्रचना तसेच मुंबई कार्यकारिणी तयार करण्यास अकार्यक्षम असलेल्या अध्यक्षांच्या जागी कार्यक्षम व्यक्तीची नियुक्ती करावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी या पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेन्द्र कवाडे यांच्याकडे  केली आहे
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष असलेले मिलिंद सुर्वे हे मागील ११ वर्षांपासून अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत . या प्रदीर्घ कार्यकाळात मुंबईसाठी सरचिटणीस किवा अन्य कार्यकारीणीच अस्तित्वात नसल्याचा आरोप राजीनामा दिलेल्या कार्यकर्त्यांनी केला आहे . ११ वर्षात मुंबईतील २२७ वार्डात कार्यकारिणी ३४ तालुक्यातील अध्यक्ष तसेच सहा लोकसभा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघात अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली नाही . केवळ ठराविक वार्ड ,तालुक्यातील नेमणुका झाल्या असून मुंबईभर पक्षाचा विस्तार करण्यास विद्यमान अध्यक्षांना अपयश आल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे  १५ सप्टेबर रोजी मुंबईसह राज्यात होणाऱ्या  निवडणुका लक्षात घेता घटक पक्षात चुकीचा संदेश जाण्यापूर्वी पक्षाने यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी प्रा. कवाडे , रिपब्लिकन युथ फोर्सचे प्रमुख जयदीप कवाडे ,आणि प्रदेशाध्यक्ष गोपाळराव आटोटे यांना प्रदेश कार्यालय भिमालय मुंबई येथे  निवेदन देवून केली आहे . 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages