मरेच्या ५ गाड्यांची तत्काळ कोट्यातील ५0 टक्के तिकिटे चढय़ा दराने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2014

मरेच्या ५ गाड्यांची तत्काळ कोट्यातील ५0 टक्के तिकिटे चढय़ा दराने


मुंबई : एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी लांबचा प्रवास करायची वेळ आली कि प्रवासी पटकन तत्काळ कोट्यातील तिकिटे काढतात. तत्काळ तिकिटांचा दर हा जास्तच असतो. त्यातच भर म्हणून आता रेल्वेची तत्काळ तिकिटांच्या कोट्यातील ५0 टक्के तिकिटे ही विमानांच्या तिकिटांप्रमाणे चढय़ा दराने विकली जात आहेत. ३ ऑक्टोबरपासून याची सुरुवात करण्यात आली आहे. 

रेल्वेची तत्काळ कोट्यातील ५0 टक्के तिकिटे ही मागणी आणि पुरवठा या तत्त्वानुसार चढय़ा किमतीने विकली जात आहेत. तत्काळ कोट्यातील पहिली ५0 टक्के तिकिटे ही नेहमीच्या तत्काळ कोट्यातून विकली जात आहेत, तर उर्वरित ५0 टक्के तिकिटे ही प्रीमियम ट्रेनच्या तिकीटदरानुसार विकली जात आहेत. त्यामुळे या तिकिटांची किंमत जास्त आहे. ५0 टक्क्यानंतर प्रत्येक १0 टक्केसीटचे आरक्षण झाल्यानंतर तिकीट दर हे २0 टक्क्यांनी जास्त आहेत. मध्य रेल्वेच्या ५ तर पश्‍चिम रेल्वेच्या ९ लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या तिकिटांमध्ये ही योजना राबवण्यात आली आहे.

पश्‍चिम रेल्वे मार्गावरील १२९५१ मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस, १२९५३ मुंबई-दिल्ली ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस, १२९५७ वांद्रे टर्मिनस-अमृतसर पश्‍चिम एक्स्प्रेस, १२९0३ मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल, १२४८0 वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस, १२४९0 दादर-बिकानेर एक्स्प्रेस, १११२५ इंदौर-ग्वालियर एक्स्प्रेस, २११२५ इंदौर-भिंड एक्स्प्रेस तर मध्य रेल्वे मार्गावरील ११0१५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस, १२५३४ सीएसटी-लखनौ पुष्पक एक्स्प्रेस, ११0९३ सीएसटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, १२१४१ सीएसटी-राजेंद्र नगर (पाटणा) एक्स्प्रेस, ११0७७ पुणे-जम्म-तावी झेलम एक्स्प्रेस या गाड्यांच्या तत्काळ कोट्यातील ५0 टक्केतिकिटे चढय़ा भावाने विकली जात आहेत. तर येत्या १९ ऑक्टोबरपासून १२८५९ सीएसटी-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, ११0१९ सीएसटी-भुवनेश्‍वर कोणार्क एक्स्प्रेस, १२१४९ पुणे-पाटणा एक्स्प्रेस, १२३२२ सीएसटी-हावडा कोलकाता मेल, १२१६३ दादर-चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्यांच्या तत्काळ कोट्यातील ५0 टक्के तिकिटे आता चढय़ा भावाने विकली जाणार आहेत.

Post Bottom Ad