अचूक निकाल वर्तवा, 21 लाख रुपये मिळवा - अंनिस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अचूक निकाल वर्तवा, 21 लाख रुपये मिळवा - अंनिस

Share This
मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचे अचूक निकाल वर्तवून 21 लाख मिळवा, असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले आहे. समितीने ज्योतिषामधील फोलपणा नेहमी समोर आणला आहे. फलज्योतिषशास्त्र आहे, असा दावा करणाऱ्या मंडळींना समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे अचूक निकाल वर्तवल्यास 21 लाख देण्यात येईल, असे आव्हान देण्यात आले आहे. त्यासंदर्भातील प्रवेशिका www.antisuperstition.org वर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी नितीन शिंदे यांच्याशी 9860438208 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages