'रिपब्लिकन पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न ' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'रिपब्लिकन पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न '

Share This
मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे रिपब्लिकन पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, अशी टीका पक्षाध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी मंगळवारी (ता. 30) केली.रिपब्लिकन पक्षाचे प्रवक्ते अर्जुन डांगळे आणि उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळे यांच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही. त्यांनी पक्षात परत यावे, असे आवाहन सरचिटणीस अविनाश महातेकर आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुमंत गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केले. डांगळे आणि खंबाळकर यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहावे; मात्र ते स्वगृही परतले नाहीत, तर कारवाई केली जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. 


डांगळे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने भीमशक्ती त्यांच्यासोबत गेल्याचा भ्रम पसरवला जात आहे; मात्र ते एवढे मोठे नेते नाहीत, असेही महातेकर म्हणाले. भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांच्या सहमतीने घेण्यात आला होता. डांगळे यांनीही तसाच सल्ला दिला होता; त्यामुळे डांगळे यांचे आरोप निराधार आहेत, असे गायकवाड म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages