आचारसंहिता भंगाच्या १४ प्रकरणात गुन्हे दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आचारसंहिता भंगाच्या १४ प्रकरणात गुन्हे दाखल

Share This
मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या १४ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उपनगरातील विधानसभा मतदारसंघात गठीत आचारसंहिता अंमलबजावणी पथकांनी दिनांक ८ ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक ठिकाणी भिंतीवरील लिखाण, पोस्टर्स, बॅनर्स व इतर अशा एकूण ४४८८ तक्रारी मिळाल्या होत्या. त्यापैकी एका प्रकरणात संबंधितावर कारवाई करण्यात आली असून ही सर्व पोस्टर्स, बॅनर्स काढून टाकण्यात आली आहेत. खासगी मालमत्तेच्या विद्रूपीकरणाबाबत ३२५ प्रकरणे आढळली यातील सर्व पोस्टर्स, बॅनर्स काढून टाकण्यात आली आहेत. 

लाल दिवा लावून वाहनांचा गैरवापरप्रकरणी ४ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात मागाठाणे येथील २ व वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील २ प्रकरणांचा समावेश आहे. परवानगी नसलेल्या बैठका व भाषणे (वैरभाव - द्वेषमुलक) या बाबतच्या ३ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात जोगेश्वरी मतदारसंघात १, दिंडोशीत १ व वर्सोवा मतदारसंघातील एका प्रकरणाचा समावेश आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages