मुंबई / अजेयकुमार जाधव
घाटकोपर पश्चिम येथील काजूपाडा, भटवाडी येथील मंगलकृपा चाळीतील ३३ ते ३४ रहिवाश्यांची घरे विकासक आणि स्थानिक राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी पालिकेच्या एन विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून तोडली आहेत. याप्रकरणाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत पालिकेच्या घाटकोपर येथील एन विभागातील दोषी अधिकाऱ्यांची नावे सिटी सिव्हिल कोर्टात सादर करून त्यांच्या विरोधात खटला चालवण्याचे आदेश रहिवाश्यांना दिले असल्याची माहिती येथील रहिवाशी रवींद्र दगडू जाधव यांनी दिले आहे.
घाटकोपर काजूपाडा भटवाडी येथे मंगलकृपा चाळ आहे. हि चाळ ज्या जागेवर आहे ती जागा जिल्हाधिकारी कार्यालयाने गलिच्छ वस्ती म्हणून घोषित केली आहे. येथील रहिवाशी असलेले रवींद्र दगडू जाधव यांच्याकडे १९६३ पासून व शासकीय नियमानुसार १९९५ पूर्वीचे अनेक पुरावे आहेत. रवींद्र जाधव यांचे आजोबा या ठिकाणी १९५२ पासून या जागेवर राहत आहेत. या ठिकाणी एसआरए प्रकल्प राबवल जात असल्याने काही लोकांना विकासकाने स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरून घरे खाली केली आहेत. तर बाकीच्यांना पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून येथील घरे खाली करण्यात आली आहेत. माहिती अधिकारातून हि घरे खाली करावी म्हणून विकासक किंवा जागेच्या मालकांनी घरे खाली करावी अशी पालिकेकडे कोणी मागणी केली आहे का असे विचारल्यावर अशी कोणतीही पालिकेकडे कोणीही केली नसल्याचे एन विभागाने कळविले असल्याचे रवींद्र जाधव यांनी सांगितले.
पावसाळ्यात घरे तोडू नयेत, पालिकेने घरे खाली करणे किंवा अनधिकृत बांधकाम केल्यास देण्यात येणाऱ्या नोटीस काळात शासकीय सुट्टी आल्यास कारवाई पुढे ढकलावी असे अनेक नियम आहेत परंतू असे सर्व नियम धाब्यावर बसवत रवींद्र जाधव व त्यांच्या चाळीतील ३३ ते ३४ घरांवर अशी कारवाही करण्यात आली आहे. रवींद्र जाधव यांची याबाबत उच्च न्यायालयात या बांधकामाबाबत १० सप्टेंबरला सुनवाई आहे हे पालिका अधिकाऱ्यांना माहित असतानाही न्यायालयाच्या आदेशांची वाट न पाहता येथील घरे तोडून टाकण्यात आली आहेत. याची गंभीर दखल घेत या अधिकाऱ्यांची नावे सिटी सिव्हिल कोर्टाला कालवून या अधिकाऱ्यांच्या विरोधात खटला चालवावा, तसेच रहिवाश्यांनी कोर्टाची परवानगी घेवून पुन्हा घरे बांधावीत असे आदेश दिले आहेत. यामुळे स्थानिक राजकारणी आणि पालिका अधिकारी यांच्या मधील आर्थिक संबंध उघड झाले असून पालिका अधिकारी गरिबांची घरे कायदा धाब्यावर बसवून तोडत असल्याने यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी रवींद्र जाधव यांनी केली आहे. तसेच या अधिकाऱ्याविरोधात खटला चालवणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे.