व्हॉट्सअॅपच्या मेसेज ‘फॉरवर्ड’वर मर्यादा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

व्हॉट्सअॅपच्या मेसेज ‘फॉरवर्ड’वर मर्यादा

Share This
व्हॉट्सअॅपवर नव्याने कोणी आलं किंवा नवा सदस्य ग्रुपमध्ये दाखल झाला की जुने-पुराने मेसेज फॉरवर्ड करतो आणि पुन्हा पुन्हा तेच मेसेज वाचून जुने यूजर वैतागतात. आता या प्रकारांना व्हॉट्सअॅपचं आळा घालणार आहेत. एक मेसेज किती वेळा फॉरवर्ड करायचा यावर मर्यादा येणार आहेत. व्हॉट्स अॅपच्या आगामी काही अपडेट्समध्ये या सुधारणा प्रत्यक्षात येऊ शकतात. यासह बहुप्रतीक्षित व्हॉइस कॉल सुविधाही आहेच.

व्हॉट्सअॅपच्या इंग्रजी मेन्यूचे भाषांतर क्राऊड सोर्सिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य यूजरकडून करून घेत आहे. त्यासाठी यूजरला पाठवलेल्या मेलमध्ये आगामी बदलांचे संकेत देण्यात आले आहेत. त्यानुसार 'एकच मेसेज ठराविक मर्यादेपेक्षा अधिक व्यक्तींना फॉरवर्ड केला तर तुम्हाला काही काळासाठी व्हॉट्सअॅपच्या वापरापासून रोखण्यात येणार आहे. काही कालावधीनंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपचा वापर पुन्हा सुरू करता येणार आहे.' हा कालावधी नेमका किती हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

ग्रुप अॅडमिनवर निर्बंध
सध्या एका व्यक्तीने किती ग्रुप तयार करायचे, यावर मर्यादा नसल्याने एकेक व्यक्ती कित्येक ग्रुप तयार करताना दिसत होती. मात्र, भविष्यात ठराविक मर्यादेपेक्षा अधिक ग्रुप तयार करण्याची परवानगी व्हॉट्सअॅप यूजरला देणार नाही. काही ग्रुपमध्ये सहभागी असलेल्यांकडून वारंवार ग्रुपचे नाव बदलले जाते. त्यामुळे ग्रुप वापरणाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो. हा गोंधळ टाळण्यासाठी 'तुम्ही अॅडमिन नसल्याने तुम्हाला ग्रुपचे नाव बदलता येणार नाही', असा संदेश व्हॉट्स अॅप पाठविणार आहे.

लाइफटाइम सर्व्हिस
प्रीपेड मोबाइलप्रमाणे व्हॉट्सअॅप अकाऊंटची वैधताही लाइफटाइम करता येऊ शकणार आहे. सध्या पहिले वर्ष मोफत सुविधेचा लाभ घेतल्यानंतर पुढील वर्षभरासाठी ०.९९ डॉलर, ३ वर्षासाठी २.६७ डॉलर आणि ५ वर्षासाठी ३.७१ डॉलर मोजावे लागतात. यात आता आयुष्यभरासाठी अकाऊंट सुरू ठेवण्याचा पर्याय उपलब्ध होईल. मात्र त्यासाठी किती रक्कम मोजावी लागणार, हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages