मीडियाने केलेल्या सर्व्हेवर भाजप नेत्यांचा विश्वास नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2014

मीडियाने केलेल्या सर्व्हेवर भाजप नेत्यांचा विश्वास नाही

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मीडियाने एक्झिट पोल जाहीर केले. या सर्वच पोलनुसार भाजपला चांगला विजय मिळेल हे स्पष्ट झाले आहे. मात्र मीडियाने केलेल्या सर्व्हेवर भाजप नेत्यांचा फारसा विश्वास नाही. त्यांच्यानुसार मीडियाने केलेल्या सर्व्हेत बऱ्याच त्रूटी आहेत. तसेच हा सर्व्हे १५ ऑक्टोबरला ३ वाजेपर्यंतचाच आहे, त्यानंतर सहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते. मात्र या काळातील मतदानाचा अंदाज सर्व्हेत व्यवस्थित बांधता आलेला नाही. त्यामुळेच भाजपने काही खासगी यंत्रणा हाती घेऊन शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत डेटा जमा केला आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी आपली विशेष टीम बनवून चार वेगळे सर्व्हे केले आहेत.त्याचा अहवाल आज मुंबईत होणाऱ्या अमित शहा यांच्या बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचे कळते.


भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानुसार, या सर्व्हेतून राज्यातील वोटिंग पॅटर्नचे चित्र स्पष्ट होईल. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शाह यांनी देखील एका खासगी संस्थेला स्वतंत्रपणे या निवडणुकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्याचाही अहवाल या सर्व्हेंच्यासोबत पडताळला जाईल. अशा प्रकारच्या सर्व्हेचा फायदा लोकसभेच्या निवडणुकांच्यावेळी झाला होता. त्यामुळे निवडणुकांनंतरची राजकीय दिशा ठरवणे अधिक सोपे जाते, असे पक्षातील कार्यकर्त्यांचे म्हणने असल्याचे सूत्र सागंतात. विधानसभा निवडणुकांच्या आधी पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेत भाजपला १३५ ते १५० जागा मिळतील असा अंदाज होता. तेव्हापासूनच पक्षाला बहूमत मिळणार असा विश्वास पक्षातील बड्या नेत्यांना होता. जर पक्षाला स्पष्ट बहुमत नाही मिळाले तर कोणत्या पक्षांना सोबत घ्यायचे याचाही विचार करण्यात आला आहे.

Post Bottom Ad