राज्यात ३ वाजेपर्यंत ४५. ६ टक्के मतदान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यात ३ वाजेपर्यंत ४५. ६ टक्के मतदान

Share This
विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई-ठाणे वगळता राज्याच्या अन्य भागांत मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. मुंबईत दुपारनंतर मतदानाचा टक्का बऱ्यापैकी वाढला असून राज्यात ३ वाजेपर्यंत ४५. ६ टक्के एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानासाठी आता शेवटचे दोनच तास उरले आहेत. दरम्यान, हरयाणात दुपारी ३ वाजेपर्यंत ५०.७ टक्के एवढे मतदान झाले आहे. 

ऑक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे राज्यात सकाळी मतदानाचा टक्का काहीसा कमी होता. मात्र, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत मतदानाचा टक्का चांगलाच वाढला आहे. मुंबईत, ठाण्यातही सकाळी फारसे मतदार बाहेर पडले नाहीत. दुपारी एक वाजेपर्यंत मुंबईत केवळ २० टक्क्याच्या आसपासच मतदान झाले होते.

नक्षलग्रस्त भागात शांततेत मतदान पार पडले. दुपारी तीन वाजेपर्यंतच होती मतदानाची वेळ. गडचिरोलीत ४४ टक्के मतदान.

यवतमाळमधील पारडी नर्सकरी गावात पोलिसांवर दगडफेक, पोलीस अधिकारी जखमी. आर्णीत मतदान केंद्रात गाडी घेऊन जाण्यावरून पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची.

कर्जत तालुक्यातील गुढवण या गावात दुपारी ३ वाजेपर्यंत तब्बल ९२ टक्के मतदान.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत दुपारी ३ वाजेपर्यंत झालेलं मतदानः 
वाशिम ३९.८ टक्के 
नांदेड ४८ टक्के 
औरंगाबाद ४३ टक्के 
भंडारा ४४ टक्के 
पुणे ४५.२९ टक्के 
सांगली ५२.५९ टक्के 
अकोला ३६ टक्के 
वर्धा ४१ टक्के 
बीड ४९.३० टक्के 
सातारा ४९.९४ टक्के 
सोलापूर ४५.४६ टक्के 
धुळे ४०.३३ टक्के 
मुंबई शहर ३७.५ टक्के 
मुंबई उपनगर ३७.९८ टक्के

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages