कमी महिलांना उमेदवारी दिल्याने नाराजी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कमी महिलांना उमेदवारी दिल्याने नाराजी

Share This
मुंबई : विधानसभा निवडणुकीत कमी प्रमाणात महिलांना उमेदवारी दिल्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवार असलेल्या सर्व पक्षांच्या महिलांना पाठिंबा जाहीर करून महिलांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी काम करावे, अशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे. 


वर्षा देशपांडे या महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्ष आहेत. राजकारणात महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याबाबत राजकीय पक्ष सकारात्मक असल्याचे त्यांनी आयोगाला सांगितले. आयोगाने घेतलेल्या भेटीच्या वेळी सर्वच पक्षांच्या प्रमुखांनी 33 टक्के आरक्षणाचे तोंडी आश्‍वासन दिले होते. हे विधेयक लवकर मंजूर होण्याची आवश्‍यकता आहे, असे लोक आयोगाचे म्हणणे आहे. निवडून आल्यानंतर या महिलांनी महिलांच्या प्रश्‍नांवर काम केले पाहिजे, अशी अपेक्षाही आयोगाने व्यक्त केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages