‘डिपॉझिट जप्ती’मध्ये मनसे पहिला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘डिपॉझिट जप्ती’मध्ये मनसे पहिला

Share This
डिपॉझिट जप्तीची नामुष्की ओढवलेल्या पक्षांच्या यादीत मनसेने पहिला क्रमांक पटकावला आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ३ हजार ७३० उमेदवारांना किमान मतेही मिळविता न आल्याने त्यांचं डिपॉझिट गुल झालं आहे. त्यात राज यांच्या मनसेची अवस्था सर्वात वाईट आहे. राज्यभरात २२८ जागा लढविणाऱ्या मनसेच्या तब्बल २०३ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निम्म्याहून अधिक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. राष्ट्रवादीच्या १४८, काँग्रेसच्या १४२, शिवसेना ११६ आणि भाजपच्या ४५ उमेदवारांचा यात समावेश आहे.अपक्ष उमेदवारांना मतदारांनी साफ नाकारल्याचं निकालानंतर स्पष्ट झालं आहे. निवडणुकीच्या आखाड्यातील १ हजार ७९८ अपक्ष उमेदवारांपैकी १ हजार ६८३ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं तर केवळ सात अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages