मुंबईकर घेतात कमी सुट्टय़ा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2014

मुंबईकर घेतात कमी सुट्टय़ा

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईमधील लोक सर्वात कमी सुट्टय़ा घेत असल्याचे एका सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. एका ताज्या पाहणीत पाच शहरांमध्ये केल्या गेलेल्या सर्व्हेक्षणामध्ये ही माहिती समोर आली आहे. मुंबईचे लोक सुट्टय़ा घेऊन आराम करण्याऐवजी काम करणे जास्त पसंद करतात, असे या पाहणीत दिसून आले आहे. 

एक्सपेडियाचे प्रबंध संचालक (आशिया) विक्रम मल्ही यांनी सांगितले की, कार्य आणि जीवनाचे संतुलन बसवण्यासाठी सुट्टय़ा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. परंतु मुंबईचे लोक सुट्टी घेऊन घरी आराम करण्याऐवजी कार्यालयात जाऊन काम करण्यात जास्त आनंद घेतात. ते त्यांना मिळणार्‍या एकूण सुट्टय़ांपैकी कमीत कमी सुट्टय़ांचा आराम करण्यासाठी उपयोग करतात, असेही या सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी एक्सपेडिया डॉट काम २0१४ च्या सर्व्हेक्षणानुसार ९७ टक्के मुंबईकर सुट्टय़ांबाबत मागे राहतात. ९६ टक्के अतिरिक्त सुट्टय़ांसाठी काही नुकसान घेण्यासाठी तयार असतात, तर ४२ टक्के सुट्टी घेणार्‍यांना स्वत:ला अपराधी असल्यासारखे वाटत असते. दुसरीकडे राजधानी दिल्ली सुट्टीच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. येथे ९९ टक्के लोक एक वेळ सुट्टीवरून परतल्यानंतर एक आठवड्याच्या आतच पुढच्या सुट्टीची योजना बनवत असतात. ते अतिरिक्त सुट्टीसाठी छोटी-मोठी जोखीम घेण्यासही तयार असतात. हे सर्व्हेक्षण २५ ऑगस्टपासून १७ सप्टेंबरदरम्यान दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्ये नॉर्थ स्टारद्वारे घेण्यात आले. 

Post Bottom Ad