मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान बिना ह्यालमेट दुचाकी वाहन चालवल्या प्रकरणी सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवाणीस यांच्या विरोधात पुण्याच्या न्यायालयात तक्रार दाखल करून ट्रयाफिकचे नियम तोडल्याने कारवाही करावी अशी मागणी केली असल्याची माहिती हेमंत पाटील यांनी पत्रकारांना दिली.
देश बचाव पार्टीचे अध्यक्ष असलेल्या हेमंत पाटील यांनी पुण्याच्या शिवाजी नगर येथील प्रथम श्रेणी न्यायालयाकडे मोटार वाहन कायदा १२९ व १७७ नुसार तक्रार दाखल केली आहे. हे कायदे बिना हयालमेट दुचाकी चालवण्या संदर्भात असून या कायद्याचे उल्लघन केल्यास १०० रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो. याचिके बरोबर पाटील यांनी फडणवीस यांचा बिना हयालमेट दुचाकी चालवतानाचा एक फोटो कोर्टात दिला आहे. नागपूर येथे केंद्रीय परिवहन व ग्राम विकास मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा बिना हयालमेट दुचाकी वाहन चालवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यांच्या विरोधात हि अश्याच प्रकारची याचिका दाखल झाली आहे अशी माहिती पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे.