परेवर वाढतेय फुकट्या प्रवाशांची संख्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

परेवर वाढतेय फुकट्या प्रवाशांची संख्या

Share This
मुंबई : उपनगरीय रेल्वेवर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढतच चालली आहे. या प्रवाशांविरुद्ध ऑक्टोबरमध्ये केलेल्या कारवाईत पश्‍चिम रेल्वेने १0 कोटींचा दंड वसूल केला आहे. पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने ऑक्टोबर महिन्यात फुकट्या प्रवाशांविरुद्ध केलेल्या कारवाईत एकूण २ लाख ५ हजार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत आपले आरक्षित तिकीट दुसर्‍याला देणार्‍या ८७७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण १0 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच रेल्वे परिसरातून १६00 फेरीवाल्यांना बाहेर हाकलण्यात आले आहे. त्यापैकी ६८ जणांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. तर १५४ जणांवर रेल्वे अँक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages