पुणे - पुणे-सासवड रस्त्यावरील वडकी गावात दलित समाजातील विवाहित महिलेवर दोघा चोरट्यांनी बलात्कार केल्याचे शनिवारी सायंकाळी उघड झाले. घरफोडी करण्याच्या उद्देशाने आलेल्या या दोन गुन्हेगारांच्या तपासाकरिता पोलिसांनी चार पथके नेमली आहेत. ग्रामीण पोलिस अधीक्षक मनोज लोहिया यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी घटनास्थळी भेट दिली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पीडित महिला आपल्या पतीसमवेत मोबाइल फोनवर बोलत होती. त्याच वेळी तिच्या घराशेजारी राहणाऱ्या दिराच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. गावी गेलेले ते कुटुंब परतले असावे, अशा समजुतीने ती त्या घरात गेली. त्याच वेळी चोरीच्या उद्देशाने घरामध्ये घुसलेल्या दोघांनी तिच्यावर हल्ला करीत भिंतीवर ढकलले. त्यामध्ये त्या महिलेची शुद्ध हरपली. नंतर त्यांनी तिच्यावर पाशवी बलात्कार केला. त्या वेळी या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे झालेल्या अंधारात ते चोरटे गावातून पसार झाले. चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही.
महिलेचे पती घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्या वेळी महिला बेशुद्धावस्थेतच होती. पोलिसांना पाचारण करून तिला शुद्धीवर आणल्यानंतर तिने सारा प्रकार पोलिसांना कथन केला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पीडित महिलेला उपचाराकरिता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस उपअधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस अधीक्षक मनोज लोहिया, अप्पर पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपअधीक्षक डॉ. कडूकर यांनी वडकी गावातील घटनास्थळाला भेट दिली. या घटनेच्या तपासासाठी चार पथके नेमण्यात आली आहेत. चोरीच्या उद्देशाने अज्ञान चोरटे तेथे आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.