केवळ सरकार पडू नये म्हणून पाठिंबा- शरद पवार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

केवळ सरकार पडू नये म्हणून पाठिंबा- शरद पवार

Share This


मुंबई- राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेले सरकार बहुमताअभावी पडू नये, तसेच आणि राज्यात पुन्हा निवडणुका घ्याव्या लागू नयेत यासाठी आम्ही राज्य सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले, ‘केवळ सरकार पडू नये म्हणून आम्ही पाठिंबा देणार आहोत. याचा अर्थ सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आम्ही पाठिंबा देणार आहोत असे नाही. जे निर्णय आम्हाला अयोग्य वाटतील त्याविरुद्ध आमचे नेते विधानसभेत आवाज उठवतील.‘सरकार अस्थिर होणार नाही याची आम्ही खात्री देतो, परंतु चुकीच्या निर्णयांना विरोध दर्शविण्यातही आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages