केईएममधील आपत्कालीन वैद्यकीय विभागाच्या उदघाटनाची घाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

केईएममधील आपत्कालीन वैद्यकीय विभागाच्या उदघाटनाची घाई

Share This
Kem Hospital
मुंबई - परळ येथील नूतनीकरणासाठी बंदिस्त असलेल्या आपत्कालीन मेडिकल विभागाचे उदघाटन घाईने करण्याचा घाट मुंबई महानगरपालिकेने घातला. विभागातील तांत्रिक बाबी पूर्ण करणे बाकी असताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आपत्कालीन मेडिकल विभागाचा उद्घाटन कार्यक्रम मंगळवारी पार पडला.

या विभागाची माहिती देताना महापौर स्नेहल आंबेकर यांनी ही माहिती दिली. कोणत्याही नवीन विभागाचे काम करताना तांत्रिक विभागाचे काम पाहावे लागते. या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठीच उद्घाटनानंतर हा विभाग रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार नाही. परंतु या तांत्रिक बाबींसाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागेल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
एक हजार ९०० पस्तीस चौरस मीटर जागेतील जुना आपत्कालीन मेडिकल विभाग संपूर्ण वातानुकूलित करून संसर्गजन्य आजारांना आळा बसेल, असा विश्वास या वेळी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी व्यक्त केला.
दरवर्षी दोन लाख रुग्ण या रुग्णालयाला भेट देतात. रुग्णांची वाढती संख्या पाहता तसेच रुग्णसेवा तात्काळ उपलब्ध होताना उत्तम दर्जाची मिळावी, यासाठी या विभागाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. या विभागात रुग्णसेवा देताना महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना वेगळे विभाग दिल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच या विभागात ७५ खाटा उपलब्ध करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
उदघाटनापूर्वीच काही सामान पळवले
मंगळवारी उदघाटनानंतर आपत्कालीन मेडिकल विभागात कार्यक्रमात सहभागींनी प्रत्यक्षात संपूर्ण विभागाची सफर घेतली. या विभागात नोंदणी विभाग, पोलिस चौकी, अपघात विभाग, ई.सी.जी. रूम, पॅथोलोजी प्रयोगशाळा, ईएमआर, सर्जिकल व अस्थिरोग विभाग, प्लास्टर रूम, क्ष-किरण कक्ष आणि औषधाचे दुकान आहे. मात्र या विभागाकडे जाण्यासाठी सुरक्षारक्षकांकडून मज्जाव करण्यात आला. याचे कारण स्पष्ट करताना या विभागातील काही सामान उदघाटनापूर्वीच चोरीला गेल्याने येथे खास सुरक्षा ठेवल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages