चुकीचा पत्ता दिल्यास रेल्वे पास रद्द होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चुकीचा पत्ता दिल्यास रेल्वे पास रद्द होणार

Share This
मुंबई(प्रतिनिधी) - उपनगरी किंवा शटल रेल्वे सेवेचा पास काढताना चुकीचा पत्ता दिल्यास संबंधित प्रवाशाचा रेल्वे पास रद्द होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाच्या निर्देशानुसार रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. रेल्वेचा पास विकत घेताना प्रवाशांना एक शपथपत्र भरावे लागेल. त्यात त्यांना त्यांचा पत्ता नीट नमूद करावा लागेल. एकदा पत्ता दिल्यानंतर पुन्हा पास काढताना नव्याने पत्ता देण्याची गरज नाही. मात्र पास काढताना रेल्वे पोलीस/रेल्वे सुरक्षा दलांकडून दिल्या जाणार्या फॉर्ममध्ये चुकीचा पत्ता दिल्यास तो पास रद्द केला जाईल, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages