मुक्त विद्यापीठाच्या पुरवणी परीक्षा ११ नोव्हेंबर पासून - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुक्त विद्यापीठाच्या पुरवणी परीक्षा ११ नोव्हेंबर पासून

Share This
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या पुरवणी परीक्षा११ नोव्हेंबर २०१४ पासून सुरुवात होत असल्याची माहितीप्रभारी परीक्षा नियंत्रक सुनील खैरनार यांनी दिली.
विद्यापीठाच्या १० विभागीय केंद्रांतर्गत होणाऱ्या यापुरवणी परीक्षेसाठी राज्यातील ८७ परीक्षा केंद्रांवर अंदाजे ८०,००० परीक्षार्थी म्हणून विद्यार्थी पुरवणी परीक्षा देणार आहेत . 

परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षाप्रवेश व परीक्षा केंद्रासाठी आपल्या अभ्याकेंद्राशी संपर्क करावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास केंद्रावर जाणे शक्य नसेल त्यांनीविद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरून प्रवेश पत्र डाऊनलोड करून घ्यावे. या प्रवेश अर्जासाठी विद्यार्थ्यांनी आपला कायम नोंदणी क्रमांक (पी.आर.एन.नंबर) आणि जन्मतारखेचा उल्लेख करून लॉगिन करणे आवश्यक आहे.


यापरीक्षा अत्यंत शिस्तबद्ध व काटेकोर पद्धतीने होणार असून,प्रवेश पत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेस बसता येणार नाही. नियोजित परीक्षा केंद्राची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनीआपल्या अभ्यास केंद्राशी अथवा संकेत स्थळावर संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages