विधानसभेत जीवा पांडू गावित हंगामी अध्यक्ष - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विधानसभेत जीवा पांडू गावित हंगामी अध्यक्ष

Share This
मुंबई : राज्य विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी प्रकृतीच्या कारणामुळे हंगामी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य जीवा पांडू गावित यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. 


नव्याने अस्तित्वात आलेल्या विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात करताना विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात सर्वात ज्येष्ठ सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नेमले जाते. सदस्यांचा शपथविधी तसेच नव्या अध्यक्षांची निवड करण्याचे काम हंगामी अध्यक्ष करतात. सरकारवरील विश्‍वास अध्यक्षांच्या निवडीच्या माध्यमातूनच होईल किंवा त्यासाठी नव्याने निवडून आलेले अध्यक्ष विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान घेतील. या वेळी ११ वेळा निवडून आलेले सांगोला मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांना हंगामी अध्यक्षपदाचा मान मिळणार होता. परंतु ८८ वर्षांच्या देशमुख यांनी त्याला नकार दिला. प्रत्येक सदस्याला शपथ देण्यासाठी उठणे वयोमानमुळे शक्य होणार नाही. त्यामुळे आपण ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही, असे त्यांनी कळविले. त्यानंतर दुसरे ज्येष्ठ सदस्य जीवा पांडू गावित यांची यासाठी निवड करण्यात आली. कळवण मतदारसंघातून सात वेळा निवडून आलेले गावित मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे असून विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळेस फडणवीस सरकारला त्यांचा पाठिंबा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages