जवखेडे हत्याकांडप्रकरणी ठाण्यात रेल रोको - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 November 2014

जवखेडे हत्याकांडप्रकरणी ठाण्यात रेल रोको

ठाणे : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे तिहेरी हत्याकांड प्रकरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक संकेतस्थळावरील बदनामीच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्ष आणि इतर बहुजन संघटनांच्या वतीनं ठाणे रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला.

यामुळे उपनगरीय वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नगर जिल्ह्यातील जवखेडे इथे दलितांच्या तिहेरी हत्याकांडानंतर ठाण्यात फेसबुक या सामाजिक संकेतस्थळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या विरोधात दलित संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे सत्र अजून सुरूच आहे. दुपारच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर बहुजन संघटनांच्या वतीने रेल रोको करण्यात आला. यामुळे २0 ते २५ मिनिटे उपनगरीय वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांना मुक्त केले. नगर हत्याकांडावरून लक्ष विचलित करण्यासाठीच हा प्रकार घडल्याचा संशय दलित संघटनांनी व्यक्त केला आहे.

Post Bottom Ad