उपनगरीय रेल्वे मार्गावर टीसींची अपुरी संख्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उपनगरीय रेल्वे मार्गावर टीसींची अपुरी संख्या

Share This
मुंबई : उपनगरीय रेल्वेने प्रवास करीत असताना तिकीट, पास दाखवा, असा आवाज आला क ी प्रवाशांची फेफे उडते. ज्या प्रवाशांकडे पास, तिकीट आहे, त्यांनादेखील आपल्याकडे पास-तिकीट नसल्यासारखे वाटते आणि त्या प्रवाशाला घाम फुटतो. काळा कोट, त्यावर असलेले पितळेचे ओळखपत्र आणि फुकट्या प्रवाशाला अचूक ओळखण्याचे कौशल्य यामुळे पूर्वी टीसींचा चांगलाच दबदबा होता. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांमुळे टीसींचा दबदबा कमी झालेला आहे.

रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी)द्वारे टीसींची भरती केली जाते. प्रामुख्याने फुकट्या प्रवाशांवर कारवाई आणि प्रवाशांना मार्गदर्शन ही त्यांची प्रमुख कामे असतात. उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवास करणार्‍या सुमारे ७५ लाख प्रवाशांमधून फुकट्या प्रवाशांना शोधणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे एक प्रकारचे दिव्य टीसींना करावे लागते. त्यातच टीसींची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण त्यांच्यावर येतो. मेल-एक्स्प्रेस आणि उपनगरीय लोकल सेवेच्या तुलनेत टीसींच्या संख्या फारच कमी आहे. पश्‍चिम रेल्वेवर ११५0 तसे मध्य रेल्वेवर १८00 टीसी आहेत. टींसीच्या कामाच्या दोन पद्धती आहेत. स्टेशन परिसरात लक्ष ठेवणे आणि लोकल-मेल एक्स्प्रेसमधील ड्युटी अशा दोन प्रकारचे काम टीसींना करावे लागते. त्यानुसार पश्‍चिम रेल्वेवर ६00 टीसी स्टेशन तर ५५0 लांब पल्ल्याच्या गाड्यांवर काम करतात. तर मध्य रेल्वे मार्गावर १000 टीसी स्टेशन तर ८00 टीसी लांब पल्ल्याच्या गाड्यांवर काम करतात. साधारणपणे ८ तासांची ड्युटी त्यांना करावी लागते. लोकल-मेल-एक्स्प्रेसमध्ये फुकट्यांवर क ारवाई करताना त्यांना दिवसाला ३ ते ४ हजार रुपयांचे टार्गेट दिले आहे. तसेच हे टार्गेट पूर्ण करताना काही विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्याचे बंधनही टाकले आहे. त्यामुळे टीसींना दोन्ही कामे करावी लागत आहेत. परिणामी टीसींचा स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.

रेल्वे बोर्डाच्या नियमाप्रमाणे ५00 प्रवाशांमागे एक टीसी अशी तरतूद आहे. मात्र गेल्या २५ वर्षात टीसींची संख्या काही वाढलेली नाही, त्याउलट प्रवाशांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे टीसींची संख्या फारच अपुरी आहे. परिणामी वाढणार्‍या प्रवाशांचे तिकीट-पास तपासताना अनेकदा टीसींवर हल्ले होत आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबई सेंट्रल येथे एका टीसीशी हुज्जत घालत प्रवाशाने त्याला रुळांवर फेकून दिले. परंतु सुदैवाने त्या वेळी लोकल येत नसल्याने त्याचे प्राण वाचले. तर दुसर्‍या एका प्रसंगात धारदार शस्त्राने एका टीसीवर हल्ला करण्यात आला होता. अशी बिकट स्थिती असतानाही टीसींचे क ाम मात्र सुरूच आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages