२00५ पूर्वीच्या चलनी नोटा बदलण्यासाठी उरले १0 दिवस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२00५ पूर्वीच्या चलनी नोटा बदलण्यासाठी उरले १0 दिवस

Share This
नवी दिल्ली ( जेपीएन न्यूज ): : बनावट नोटांची वाढती व्याप्ती पाहता त्यावर प्रतिबंध लावण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सन २00५ पूर्वीच्या चलनी नोटा जमा करण्याची मोहीम सुरू केली होती. आतापर्यंत रिझर्व्ह बँकेकडे तब्बल ५२,८५५ कोटी रुपयांच्या १४४.६६ कोटी नोटा जमा केल्या आहेत. ३१ डिसेंबर २0१४ पर्यंतची कालर्मयादा असल्याने आता आपल्याकडील नोटा बदलण्यासाठी नागरिकांकडे अवघे १0 दिवस उरले आहेत.


साल २00५ नंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने छापलेल्या चलनी नोटांमध्ये सुरक्षेच्या अधिक उपाययोजना आखल्या गेल्या आहेत. परिणामी, रिझर्व्ह बँकेने २00५ पूर्वीच्या नोटा बँकेत जमा करून त्या बदल्यात नव्या नोटा घेण्याचे आवाहन २२ जानेवारी रोजी केले होते. तेव्हापासून मोठय़ा प्रमाणावर नागरिकांनी बँकात धाव घेऊन नोटा बदल्यास सुरुवात केली होती. बनावट नोटांच्या व्यवहारांना पायबंद घालण्यासाठी बँकेने ही मोहीम हाती घेतली होती. आतापर्यंत रिझर्व्ह बँकेकडे ५२,८५५ कोटी रुपयांच्या १४४.६६ कोटी नोटा बदल्या गेल्या असून १ जानेवारी २0१५ पर्यंतच ही मोहम राबवली जाणार आहे. त्यामुळे नोटा बदलण्यासाठी आता १0 दिवस शिल्लक असल्याने या कालावधीत नागरिकांनी आपल्याकडील नोटा बदलून घेण्यास पुढाकार घ्यावा, असेही बँकेकडून सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages