पश्‍चिम उपनगरातील सात पुलांची दुरुस्ती महापालिका करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पश्‍चिम उपनगरातील सात पुलांची दुरुस्ती महापालिका करणार

Share This
पश्‍चिम उपनगरातील सात पुलांच्या दुरुस्तीचा निर्णय महापालिकेने घेतला असून, त्यासाठी १५ कोटी रुपये खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीमध्ये संमतीसाठी मांडण्यात येणार आहे. हे काम 'मे. एम.ई. इन्फ्रा प्रोजेक्टस् लिमिटेड' या कंपनीला देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. अंधेरी रेल्वे पूल, मिठी नदी पूल, वाकोला नाला पूल, पार्ले फॅक्टरी पूल, मालाड-पोयसर पूल, बोरिवली-दहिसर पूल, ओशिवरा पूल या पुलांवर खड्डे पडले असून, काही ठिकाणी सांधेही उखडले गेल्यामुळे त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, अशी शिफारस तांत्रिक समितीने केली होती. हे काम मेकॅनाईज्ड/मास्टिक पद्धतीने करण्याची शिफारसही समितीने केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages