विवाहपूर्व शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही - उच्च न्यायालय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विवाहपूर्व शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही - उच्च न्यायालय

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ) : लग्नाचे आश्‍वासन देऊन प्रस्थापित केलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही. प्रेमीयुगुलातील अशा विवाहपूर्व शारीरिक संबंधांचे प्रमाण मुंबई-पुणे यासारख्या महानगरांत वाढले आहे. या महानगरांत तर यासाठी संमतीच मिळू लागली आहे. त्यामुळे भारतातील महानगरांसाठी विवाहपूर्व शारीरिक संबंध दीर्घकाळ 'धक्कादायक' नसल्याचा मागील वर्षभरातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. नाशिक येथील रहिवासी राहुल पाटील (नाव बदललेले) याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले.
राहुलची गर्लफ्रेण्ड सीमा देशमुख (नाव बदललेले) हिच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी राहुलविरोधात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. सीमा ही राहुलमुळे गर्भवती राहिली होती. राहुलने लग्नाचे वचन देऊनही नंतर तो दुसर्‍या मुलीशी विवाहबद्ध झाल्याचा आरोप सीमाने तक्रारीद्वारे केला होता. त्यावर राहुलने तसे संबंध संमतीने प्रस्थापित केले तसेच दोघे वेगवेगळ्या धर्माचे असल्याने लग्न करू न शकल्याचा दावा केला होता. राहुल व सीमा हे दोघे पेशाने वकील होते. १९९९ पासून ते दोघे एकमेकांना ओळखू लागले व २00६ पासून त्यांनी शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली होती. राहुलने लग्नाचे वचन दिले होते; पण २00९मध्ये त्याने लग्न करू शकणार नसल्याचे सांगताच सीमाने आत्महत्येचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, त्यानंतरही दोघांमधील शारीरिक संबंध कायम राहिले होते. या प्रकरणात न्यायालयाने नमूद केले की, सुजाण आणि सुशिक्षित मुलीला शरीरसंबंधाची मागणी तसेच शरीरसंबंधाचे परिणाम ध्यानात येणे अपेक्षित होते. तसेच तिने स्वत: शरीरसंबंधाबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही, हे वैयक्तिकरीत्या तपासून पाहायला हवे होते. राहुल आणि सीमा हे सुशिक्षित होते. २0११मध्ये राहुलने पोलिसांकडे प्रतिज्ञापत्र दाखल करून सीमा लग्नासाठी जबरदस्ती करत होती. तसेच ती आत्महत्या करण्याचीही धमकी देत होती. त्यानंतर २0१३मध्ये सीमाने राहुलविरोधात फसवणूक आणि बलात्काराची तक्रार नोंदवली होती.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages