चेंबूरमधील वैद्य तरणतलावाच्या पुनर्बांधणीसाठी २२ कोटीं खर्च होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चेंबूरमधील वैद्य तरणतलावाच्या पुनर्बांधणीसाठी २२ कोटीं खर्च होणार

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ) : २00७ पासून गेली सात वर्षे बंद अवस्थेत असलेल्या चेंबूरमधील जनरल अरुणकुमार वैद्य तरणतलावाच्या पुनर्बांधणीसाठी महापालिका २२ कोटी ४१ लाख रुपये खर्च करणार आहे. 


सध्याचा तरणतलाव ऑलिम्पिक आकाराचा बांधण्यात येणार असून, त्यात प्रेक्षक गॅलरी, प्रशासकीय इमारत, बगीचा, शौचालय, उपाहारगृह, अग्निशमन व वीजपुरवठा यंत्रणा, व्यवस्थापक कक्ष, पाण्याचे गाळणीगृह, संग्रह कक्ष आदी सुविधा असतील. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. हा तरणतलाव १९९२-९३ मध्ये बांधण्यात आला. मात्र या तरण तलावात खूप मोठय़ा प्रमाणात झालेली गळती व संरचनात्मक दुरुस्ती कामांसाठी २00७ पासून हा तलाव बंद ठेवण्यात आला. 

मात्र या तलावाच्या दुरुस्तीसाठी आर्थिक भार पडणार असल्याने पालिकेला हे काम करता आले नाही. पालिकेने या तलावाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटदाराला ७५:२५ या तत्त्वावर काम देण्यात येणार आहे. काम पूर्ण होईपर्यंत ७५ टक्के रक्कम व उर्वरित २५ टक्के रक्कम दोन वर्षांत चार टप्प्यांत देण्यात येणार आहे. हे काम मे. एपीआय सिविलकॉन प्रा. लि. कंपनी करणार आहे. १८ महिन्यांच्या कालावधीत पुनर्बांधणीचे काम करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages