नागरिकांची गैरसोई टाळण्यासाठी गोरेगाव मध्ये पालिकेचा पादचारी पूल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2014

नागरिकांची गैरसोई टाळण्यासाठी गोरेगाव मध्ये पालिकेचा पादचारी पूल

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : गोरेगाव पूर्व येथील प्रवासी इंडसट्रीयल इस्टेटजवळ गोरेगाव- मुलुंड लिंक रोड ओलांडताना नागरिकाना होणारी गैरसोय टाळण्यासाठी पादचारी पूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी २ कोटी १८ लाख २८ हजार ६१० रुपये खर्च करणार आहे . तसा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. 

गोरेगाव पूर्व विभागात लाखो लोक राहत असून येण्या जाण्याचे प्रमाणही  आहे गोरेगाव मुलुंड लिंक रोड ओलांडताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोई होत आहे. ही गैरसोई टाळण्यासाठी पालिकेने पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तेथील नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे . पालिका प्रवासी इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ गोरेगाव- मुलुंड लिंक रोड येथे पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाची लांबी ६९ मीटर आणि ३ मीटर रुंद असणार आहे. या पुलाचा आराखडा, संकल्प चित्रे, नियोजन, अंदाज पत्रक व मसुदा निविदा तयार करण्याकरीता मे. पेन्टकल कन्सल्टन्ट (इं) प्रा. लि. या तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली होती . पूल बांधण्यासाठी चे काम मे. आर. ई. इंफ्रा. प्रा. लि . यांना दिले आहे. सन २०१५- च्या अर्थ संकल्पीय अंदाजात पुरेशी तरतूद केली जाणार आहे. हे काम पावसाला सोडून १२ महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. यासाठी पालिका २ कोटी १८ लाख २८ हजार ६१० रुपये खर्च करणार आहे.               

Post Bottom Ad