नवीन वर्षात बँका तब्बल पाच दिवसांच्या मेगा संपावर जाणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नवीन वर्षात बँका तब्बल पाच दिवसांच्या मेगा संपावर जाणार

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ) :  - युनायटेड फोरम्स ऑफ बँक युनियन्स आणि इंडीयन बँक असोसिएशन यांच्या द्विपक्षीय कराराच्या वाटाघाटीच्या फेर्‍या सातत्याने निष्पळ ठरल्यामुळे नवीन वर्षात बँका तब्बल पाच दिवसांच्या मेगा संपावर जाणार आहेत. पहिल्याच आठवड्यात ७ जानेवारीला आणि नंतर २१ तारखेपासून २४ तारखेपर्यंत बँक कर्मचार्‍यांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यात २५ तारखेला रविवार आणि २६ जानेवारीला पुन्हा बँक हॉलिडे यामुळे तब्बल आठवडाभर बँका बंद राहणार आहेत. 

बँक कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या इंडीयन बँक असोसिएशनने अमान्य केल्यामुळे बँक कर्मचार्‍यांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. ७ जानेवारीला सोमवार असल्यामुळे आदल्यादिवशी सुट्टीचा दिवस असल्यामुळे देशभरातली एटीएम केवळ दोन तासांत रिकामी होणार आहेत. रविवारी लांबच्या लांब रांगा एटीएमबाहेर लागणार आहेत. त्यानंतर २१ तारखेपासून पुन्हा संप पुकारण्यात येणार असल्यामुळे नवीन वर्षाचा तिसरा आठवडा बँक कर्मचार्‍यांसाठी आणि ग्राहकांसाठीही मोठा जिकिरीचा असणार आहे. कर्मचार्‍यांवर कामाचा प्रचंड ताण तर ग्राहकांना याच आठवड्यात सर्व व्यवहार करून घ्यावे लागणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages