दत्तक वस्तीमधील सफाई कामगारांना पालिकेच्या सेवेत घेण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दत्तक वस्तीमधील सफाई कामगारांना पालिकेच्या सेवेत घेण्याची मागणी

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबईतील साफसफाईची समस्या सोडवण्यासाठी महानगर पालिकेकडून स्थानिक संस्थांची मदत घेण्यात येते. या स्थानिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांना पालिकेच्या सेवेमध्ये सामावून घ्यावे अशी ठरावाची सूचना नगरसेविका सुषमा साळुंखे यांनी मंडळी आहे. 

मुंबईमधील साफ सफाई करण्यासाठी दत्तक वस्ती योजना राबविण्यात येत आहे. सदर संस्थांमध्ये काम करणारे पुरुष आणि स्त्री कामगार गेले कित्तेक वर्षे कोणत्याही कायमस्वरूपी सुविधा आणि फायद्याशिवाय काम करत आहेत. अश्या कामगारांना महानगरपालिकेत कायमस्वरूपी रोजगार दिल्यास त्यांच्यासाठी प्रोत्साहनपार ठरू शकते यामुळे दत्तक वस्ती मध्ये काम करणाऱ्या कामगारांना पालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी करावे अशी मागणी सुषमा साळुंखे यांनी केली आहे. या ठरावाच्या सुचनेवर येत्या पालिका सभागृहामध्ये चर्चा केली जाणार आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages