मुंबई महानगर पालिकेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा.- जितेंद्र आव्हाड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महानगर पालिकेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा.- जितेंद्र आव्हाड

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ): डास प्रतिबंधक असणाऱ्या बनावट औषधाची खरेदी करुन १६४ लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मुंबई महानगर पालिकेवर,तसेच संबधीत व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी केली.

आ.जितेंद्र आव्हाड ,आ.शशिकांत शिंदे,आ.संदीप नाईक यांनी आज विधानसभेत यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी आ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की मुंबई महानगर पालिकेने डेंग्यु , मलेरिया सारख्या रोगाच्या उच्चाटनासाठी डासांना मारण्यासाठी ‘निता पॉल ’ या कंपनीला कंत्राट दिलेले होते. 
या कंपनीच्या ‘ पायरेथ्रम अस्टॅक्ट २ टक्के’ औषधाचे नमुनेच योग्य नसल्यामुळे पुणे महापालिका आणि मध्यप्रदेश शासनाने या कंपनीला काळ्या यादीत टाकले असताना देखील राज्यातील मुंबई महानगर पालिके सहित काही महानगर पालिकांनी या कंपनीची औषधे, साहित्य खरेदी केले होते. या औषध व्यवहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सदर भ्रष्टाचाराची चौकशी होणे आवश्यक आहे.

डासांना मारण्यासाठी ‘निता पॉल’कंपनी कडून मुंबई महानगर पालिकेने‘पायरेथ्रम एक्सट्रॅक २ टक्के’ खरेदी केले होते. परुंतु या औषधाच्या क्षेत्रीय चाचणी दरम्यान अपेक्षीत डास मृत न पावल्याने त्याकंपनीला दंड करण्यात आला होता. संबधीत कंपनी दोषी आढळली असताना देखील मुंबई महानगर पालिकेने पुन्हा त्याच कंपनी कडून औषधांची खरेदी केली होती. परुंतु या दरम्यान मुंबई शहारातील १६४ लोकांचे डेंग्यु सारख्या रोगाने बळी गेलेले आहेत. हा बाब अत्यंत गंभीर असून याला जबाबदार असणाऱ्या मुंबई महानगर पालिकेवर तसेच संबधित व्यक्तीवर कलम ३०२ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली . 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages