अग्निशमन दलाचे जवान ओटीपासुन वंचित - वडाळा येथे लक्षवेधी आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अग्निशमन दलाचे जवान ओटीपासुन वंचित - वडाळा येथे लक्षवेधी आंदोलन

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ): शहरातील नागरीकांना विविध संकटांपासुन वाचवुन त्यांना सुरक्षित ठेवणाऽया अग्निशमन दलांच्या जवानांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील पाच वषार्पासुन ज्यादा काम केलेल्या कामाचे रक्कम आतपर्यंत मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेना मुंबईचे सरचिटणी सुनिल चिटणीस आणि कार्याध्यक्ष शरद कुवेसकर यांनी उघडकीस आणली. जवानांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी २४ डिसेंबर रोजी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुयर्कांत महाडीक याच्या नेतृत्त्वाखील ४00ते ५00 जवान वडाळा येथील अग्निशमन दलाच्या केंद्रामध्ये धरणे आंदोलन करणार आहे.

शहराच्या सुरक्षा करणाऽया जवानांना अपमानास्पध वागणुन मिळणे हे कोणत्याही शहराला किंवा देशाला शोभणारे नाही आहे. अतिरिक्त आयुक्त देशमुख यांच्या दालनामध्ये कालबध्द पदोन्नती १ जुलै २00५ पासुन सरसकट देण्यात यावी असे स्पष्ट आदेश देशमुखांनी दिल्यानंतर आतापर्यंत अमंलबजावणी करण्यात आली नाही आहे. कर्मचाऽयांना वेतन कराराबाबत योग्य प्रसिक्षण देण्यात येत नसल्यामुळे जवानांची वेतन निश्चिती चुकीच्या पध्दतीने होत आहे. जवानांकडुन घेण्यात आलेल्या रजा आणि त्यांच्या प्रवासभत्त्याची रक्कम सहा म्हिण्यापर्यंत मिळत नाही. कोणत्याही मामाचे नियोजन योग्य त्याप्रमाणे नसल्यामुळे अनेक कर्मचाऽयांना त्यांचा फटका पडत आहे. शहारची सुरक्षा करणाऽया जवानंना जर असे दिवस पाहण्यास मिळत आहे तर सामान्य नागरीकांच्या विषयच याठिकाणि येत नाही जवानांना येणाऽया या विविध अडचणी आणि संबधित प्रशासनांच्या विरोधात बुधवार २४ डिसेंबर रोजी वडाळा येथे एक दिवसीय धरेन आंदोन करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages