जगातील सर्वाधिक ५0 महागड्या जागांमध्ये बीकेसी, नरिमन पॉईंट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जगातील सर्वाधिक ५0 महागड्या जागांमध्ये बीकेसी, नरिमन पॉईंट

Share This
मुंबई ( जेपीएन न्यूज ) : जगभरातील सर्वाधिक ५0 महागड्या कार्यालयीन जागांमध्ये मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि नरिमन पॉईंटचा समावेश झाला आहे. व्यावसायिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या बीकेसीने या यादीत १६ वा क्रमांक, तर नरिमन पॉईंटने ३२ वे स्थान पटकावले आहे. सीबीआरईने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. 


सर्वाधिक महागड्या कार्यालयीन जागांमध्ये दिल्लीतील 'कनॉट प्लेस' येथील केंद्रीय व्यापार जिल्हा (सीबीडी) या व्यापारी केंद्राने सहावे स्थान मिळवले आहे. या ठिकाणचे वार्षिक भाडे १६0 डॉलर प्रति चौ. फूट इतके आहे. लंडनमधील 'वेस्ट एण्ड' या भागाने या यादीत सर्वोच्च स्थान पटकावले आहे. वेस्ट एण्ड येथील कार्यालयाचे वार्षिक भाडे २७४ डॉलर प्रति चौ. फूट इतके आहे. त्यानंतर हाँगकाँग सेंट्रल या ठिकाणाचा क्रमांक लागतो. येथील कार्यालयीन जागेचा दर प्रति चौ.फू. २५१ डॉलर इतका आहे. त्याखालोखाल बीजिंगचे फायनान्स स्ट्रीट (१६५ डॉलर प्रति चौ. फू.), बीजिंग येथीलच सीबीडी (१८९ डॉलर प्रति चौ.फू.) आणि मॉस्को (१६५ डॉलर प्रति चौ. फू.) या ठिकाणांचा पहिल्या ५ मध्ये क्रमांक लागतो, तर मुंबईतील बीकेसीतील कार्यालयीन जागेचा दर वर्षाला १0४ डॉलर प्रति चौ. फू. इतका, तर नरिमन पॉईंट येथील दर ७७ डॉलर प्रति चौ. फू. असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages