रिपब्लिकन पक्षाची १0 जानेवारीला बैठक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रिपब्लिकन पक्षाची १0 जानेवारीला बैठक

Share This
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक येत्या १0 जानेवारीला मुंबईत माविमच्या सभागृहात होणार असून या बैठकीत पक्षाला मंत्रिमंडळात अजून सहभागी करून न घेतल्याबद्दल नाराजीचा सूर उमटला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


सकाळी १0 वाजता ही बैठक सुरू होणार असून पक्षाध्यक्ष रामदास आठवले उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन, विभागनिहाय कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, संघटनात्मक बांधणी व सदस्यांची नोंदणी, याबाबत आठवले उपस्थितांना मार्गदर्शन करणार असल्याचे कळते. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीबरोबर राहिलेल्या रिपब्लिकन पक्षाला केंद्र तसेच राज्य सरकारमधील सहभागाबद्दल अजूनही दूरच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी या वेळी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages