अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2015

अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : मुंबईतील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी महापालिकेने 'इमॅजरी सॅटेलाईट' तंत्रज्ञान विकसित करावे, अशी मागणी नगरसेवक परमिंदर सिंग भामरा यांनी महापालिकेकडे केली आहे. हे तंत्रज्ञान विकसित केल्यास 'सुंदर मुंबई'चे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

मुंबई शहरात अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या बेकायदेशीर बांधकामांमुळे मुंबईच्या विकासात मोठा अडथळा निर्माण होत असून, शहराला मूलभूत सोयी-सुविधा पुरवणार्‍या महापालिका प्रशासनावरही त्याचा ताण पडत आहे. मुंबईसारख्या विकसित व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात 'इमॅजरी सॅटेलाईट'द्वारे अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणणे सोयीचे जाईल. अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणि निष्कासन करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ सध्या महापालिकेकडे नाही तसेच सगळय़ाच ठिकाणी महापालिका प्रशासन पोहोचू शकणार नाही. ही वस्तूस्थिती लक्षात घेता, मुंबई महापालिकेने 'इमॅजरी सॅटेलाईट' तंत्रज्ञान विकसित करावे आणि ते सर्व कार्यालयांमध्ये वापरावे, अशी मागणी भामरा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. या ठरावाच्या सूचनेवर महापालिकेच्या महासभेत चर्चा होणे अपेक्षित आहे.

Post Bottom Ad