रेडीरेकनरच्या दरात १५ टक्क्यांची वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेडीरेकनरच्या दरात १५ टक्क्यांची वाढ

Share This
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील जमिनीचे दर १ जानेवारी रोजी वाढणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून त्यात मुंबईतील रेडीरेकनर दर कमीत कमी १५ व सरासरी १८ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. या वाढीव दरामुळे मुद्रांक शुल्कात वाढ होऊन गृहखरेदीत ४ ते ५ टक्के वाढून घरे महाग होणार आहेत. रेडीरेकनरचे वाढलेले दर हा परवडणार्‍या घरांच्या योजनेकडे दुर्लक्ष करून केवळ गृहनिर्माणातील महसूल वाढविण्याची खटपट असल्याचे मत बिल्डर्स असोसिएशन इंडियाचे आनंद गुप्ता यांनी 'पुण्य नगरी'शी बोलताना स्पष्ट केले आहे. 

बांधकाम क्षेत्रातील मंदी, घरांची कमी झालेली मागणी, वाढलेले घरांचे दर यामुळे सध्या गृहनिर्माण क्षेत्रात रेडीरेकनर दर वाढण्यास पोषक वातावरण नाही. त्यामुळे रेडीरेकनर दर वाढू नयेत, अशीच सर्वसामान्यांची भावना होती. हे दर वाढवताना गृहनिर्माण क्षेत्रातील विकासकांना विश्‍वासात न घेतल्याचे मत बीएआयचे आनंद गुप्ता यांनी व्यक्त केले आहे. शासनाने परवडणार्‍या घरांसाठी पावले उचलावीत याकडे लक्ष देणे गरजेचे असताना केवळ महसूल उत्पन्न वाढीकडे लक्ष देण्यात आल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. रेडीरेकनर दरामध्ये स्टॅम्प ड्युटी, फंजीबल एफएसआय, टीडीआर, प्रीमियम असे एकूण ३ ते ४ टक्के दर विकासक गृहखरेदीदारांकडून वसूल करतील, त्यामुळे घरांच्या किमती वाढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages