६.५ टक्क्यांकडे जीडीपीची घोडदौड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

६.५ टक्क्यांकडे जीडीपीची घोडदौड

Share This
नवी दिल्ली : भारत सरकारच्या सुधारणांचा अजेंडा रुळांवर असून देशांतर्गत अर्थव्यवस्था ६.५ टक्क्यांकडे घोडदौड करीत आहे तसेच महागाई ६ टक्क्यांच्या स्तरावर राहण्याची शक्यता आहे, असे मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालात म्हटले आहे.


वित्तीय सेवा देणार्‍या मॉर्गन स्टॅन्ले या जागतिक कंपनीच्या म्हणण्यानुसार, सरकारद्वारे अलीकडेच उचलण्यात आलेल्या पावलांमुळे गुंतवणूकदारांचा विश्‍वास वाढला आहे. त्यामुळे सरकारच्या सुधारणा विकासाच्या रुळावर आल्या असून आर्थिक विकासदराने जोर पकडला आहे. मॉर्नन स्टॅन्लेचे मुख्य अर्थतज्ज्ञ (आशिया-प्रशांत) चेतन अहया यांनी सांगितले की, सरकारच्या धोरणात्मक कारवाईने उत्पादकतेतील मंदी हळूहळू दूर होत असून या क्षेत्रासंदर्भातील आमचा विश्‍वास वाढला आहे. भारताची अर्थव्यवस्था ६.५ टक्केचा विकासदर प्राप्त करण्याच्या दिशेने पुढे सरकत असून भारताचा जीडीपी विकास दर मागील २५ वर्षांमध्ये सरासरी ६.५ टक्के राहिला आहे, मात्र मागील दोन वर्षांमध्ये हा दर सरासरी ४.९ टक्केवर घसरला होता, तर दुसरीकडे महागाईही बरीच वाढली होती. मात्र नवीन सरकारच्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येताना दिसत आहे, असेही ते म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages