पीके चित्रपट दादागिरी करून बंद पाडू नए - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पीके चित्रपट दादागिरी करून बंद पाडू नए

Share This
कवी गायक द्न्यानेश पुणेकर यांना रिपाइ कडून ५० हजाराची मदत 
मुंबई / अजेयकुमार जाधव  
पीके चित्रपटात हिंदू धर्मावर टिका केली नसून हिंदू धर्मामधील चुकीच्या चाली रितीवर टिका केली आहे. पीके हा चित्रपट हिंदू धर्मातील चालीरितीना आव्हान देणारा असल्याने कोणीही दादागिरी करून चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न करू नए असे आवाहन रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले यानी केले आहे. रिपाइ आठवले गटाच्या वतीने संविधान बंगल्यावर वयोवृद्ध कवी शायर गायक द्न्यानेश शिंदे - पुणेकर यांना ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली त्यावेळी आठवले बोलत होते. 

पीके चित्रपटात आमिर खान हा मुस्लिम नायक असला तरी या चित्रपटाचे प्रोड्यूसर आणि डायरेक्टर सर्वच हिंदू आहेत. हिंदू धर्मातील चुकीच्या चालीरीती प्रदर्शित करणे म्हणजे धर्मावर टिका करने असा याचा चुकीचा अर्थ काढू नए. या चित्रपटाला सेन्सोर बोर्डाने मंजूरी दिली आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानीही चांगला चित्रपट आहे, चित्रपटात काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले असल्याने आन्दोलन करणारया हिंदू संघटनांना ही चपराक असल्याचे आठवले यानी म्हटले आहे. 

कवी शायर गायक द्न्यानेश शिंदे - पुणेकर यांच्या सारख्यानी आपल्या आयुष्यात गाणी लिहून समाजात जनजागृती केली आहे. गाण्यामधील शब्दानी माणसाची मने पेटवून असंख्य लोकाना प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे. द्न्यानेश शिंदे - पुणेकर यांच्या सारख्याना तरुण असताना चांगले दिवस असतात परंतू वयोवृद्ध झाल्यावर त्याना कोणीही विचारत नाही. अश्या दुर्लक्षित कवी गायकाना रिपाइ च्या वतीने नेहमी मदत केली जाते. तशीच मदत पुणेकर याना केली असल्याचे आठवले यानी सांगितले. यावेळी द्न्यानेश शिंदे - पुणेकर यानी आपण वयाच्या सहाव्या वर्षापासून गायन आणि कवी म्हणून लोकप्रबोधन केले पण आजही वडाला येथील सिद्धार्थ वस्तिगृहात राहत आहे. सरकारने मला सरकारी घर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली.  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages