अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्सच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १२९२ व १२९३ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्सच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १२९२ व १२९३

Share This
मुंबई : उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने अनधिकृतपणे लागणार्‍या पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊट्सविरोधात तक्रारी करण्यासाठी दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. १२९२ व १२९३ या दोन टोल फ्री क्रमांकावर अनधिकृतपणे लागणार्‍या पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊट्सबाबत नागरिक तक्रारी करू शकतात.


महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल) यांच्या दूरध्वनीवरून करण्यासाठी हा टोल फ्री क्रमांक १२९२ किंवा १२९३ हा सरळ डायल करावा व त्यानंतर आपली तक्रार संबंधितांकडे नोंदवावी. तसेच भ्रमणध्वनीद्वारा तक्रार करण्याकरिता प्रथम 0२२-२२६९ हा क्रमांक डायल करून नंतर टोल फ्री क्रमांक १२९२ किंवा १२९३ क्रमांक दाबावा व त्यानंतर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. नागरिकांकरिता ही सेवा नि:शुल्क आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages