Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

वीज दरवाढीच्या विरोधात मुंबई कॉंग्रेसची स्वाक्षरी मोहिम सुरु

मुंबई - २ सप्टेंबर २०१५ - 
सरकार विजेचे दर कमी झाल्याचा दावा करत असताना मुंबईत रिलायन्स, टाटा, एमएसईबी आणि बेस्टची भरमसाठ बिले. मुंबईतील सर्वसामान्य लोकांमध्ये संताप निर्माण झालाय याकरिता मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात मुंबई कॉंग्रेस तर्फे संपूर्ण मुंबईत ३५० हून अधिक ठिकाणी भरमसाठ वीज दरवाढीचा जाहिर निषेध करण्याकरिता स्वाक्षरी मोहिम घेण्यात आलेली आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज बुधवार दि. २ सप्टेंबर, २०१५ रोजी वर्सोवा विधानसभा, दिंडोशी विधानसभा, कांदिवली पूर्व विधानसभा, दहिसर विधानसभा, मागठाणे विधानसभा, बोरीवली विधानसभा, अंधेरी पूर्व विधानसभा येथे वीज दरवाढीच्या जाहिर निषेध स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. सर्वसामान्य मुंबईकर वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाला आहे, अशाच वीज दरवाढीमुळे मुंबईकरांचा आर्थिक डोलारा ढासळत आहे, महाग झाली धान्ये-भाज्या-औषधे त्यावर आता विजेचा बोजा, अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा टोला मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी लगावला.

भाजपा प्रणीत केंद्र सरकार व राज्य सरकार ‘‘ अच्छे दिन ’’ चा नुसताच वादा करतात परंतु भाजपचा पाठींबा असल्यामुळे रिलायन्स, टाटा, एमएसईबी आणि बेस्ट या वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या भरमसाठ लाभ उठवीत आहेत, या अन्यायकारक वीजदर वाढीचा मुंबई कॉंग्रेस तीव्र निषेध करीत असून हि वीज दरवाढ वाढ रद्द करावी, म्हणून मुंबई कॉंग्रेस तर्फे स्वाक्षरी मोहिम सुरु करण्यात आली आहे, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात बुधवार दि. २ सप्टेंबर, २०१५ व गुरुवार दि. ३ सप्टेंबर, २०१५ रोजी रिलायन्स, बेस्ट, टाटा व एमएसईबी या वीज कंपन्यांनी केलेल्या भरमसाठ वीज दरवाढीचा जाहिर निषेध करण्याकरिता स्वाक्षरी मोहिम घेण्यात आलेली असून या वीज दरवाढ निषेध मोहिमेस जनतेकडून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे व जनतेच्या आग्रहामुळे निषेध पत्रकाचे वाटप, वीज बिलाच्या प्रती व निषेध पत्रकावर सह्या ही मोहीम शुक्रवार दि. ४ सप्टेंबर, २०१५ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे... 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom