मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे भीषण आग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे भीषण आग

Share This

मुंबई - दक्षिण मुंबईमधील क्रॉफर्ड मार्केट (महात्मा ज्योतिबा फुले मंडई) भागामध्ये भीषण आग लागली असून येथील फळ बाजारातील किमान 100 दुकानांमधील माल पूर्णत: नष्ट झाला आहे. 

या आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले आहेत. मनपा आयुक्त अजोय मेहता हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे 11 फायर इंजिन व 7 पाण्याचे टॅंकरही आले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग विझविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आता यश आले आहे. क्रॉफर्ड मार्केटमधील या आगीमुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages