पालिकेच्या १४ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या १४ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

Share This

मुंबई (प्रतिनिधी) - मुंबई महानगर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील १४ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. अजोय मेहता यांनी आयुक्त पदाचा कारभार स्वीकारताच उपायुक्तांच्या बदल्या करून अधिकार्‍यांना दणका दिला होता. याच वेळी सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे संकेत आयुक्तांनी दिले होते परंतू पावसाळा असल्याने विभागाची माहिती सहाय्यक आयुक्तांना असल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते या कारणाने या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या नव्हत्या. आता पावसाळा संपल्या नंतर आयुक्तांनी सहाय्यक आयुक्त दर्जाच्या १४ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. 


आयुक्तांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे भाग्यश्री कापसे यांची के पूर्व विभागातून जी दक्षिण विभागात, केशव उबाळे यांची जी दक्षिण विभागातून एफ उत्तर विभागात, अलका ससाणे यांची एफ उत्तर विभागातून नियोजन विभागात, शरद उघाडे यांची जी उत्तर विभागातून एच पश्‍चिम विभागात, विजय कांबळे यांची एच पश्‍चिम विभागातून आर उत्तर विभागात, संतोष दोंडे यांची आर उत्तर विभागातून पी दक्षिण विभागात, रमाकांत बिरादर यांची पी दक्षिण विभागातून जी उत्तर विभागात, प्रशांत गायकवाड यांची एस विभागातून एच पूर्व विभागात, चंदा जाधव यांची टी विभागातून एस विभागात, देवेंद्र जैन यांची पी उत्तर विभागातून के पूर्व विभागात, सत्यप्रकाश सिंग यांची एच पूर्व विभागातून सी विभागात, संगीता हसनाळे यांची सी विभागातून पी उत्तर विभागात, अजितकुमार आंबी यांची अतिक्रमण निर्मूलन विभागातून एल विभागात तर प्रशांत सकपाळे यांची एल विभागातून टी विभागात बदली करण्यात आली आहे. हे बदली आदेश ३० ऑक्टोबर पासून तातडीने लागू करण्यात आले आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages