रामपाल महाराजांना जेल मधून सोडवण्या साठी मुंबईत मोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रामपाल महाराजांना जेल मधून सोडवण्या साठी मुंबईत मोर्चा

Share This

मुंबई / प्रतिनिधी - जातीवाद धर्मवाद सांप्रवाद संपवन्याचे काम रामपाल महाराज यांनी केले. यामुले आर्य समाज, बाबा रामदेव, हरयाणाचे मुख्यमंत्री हुड्डा यांनी संगनमत करून रामपाल महाराज याना देशद्रोह आणि खुनाच्या गुन्ह्यात अड्कवले आहे. यामुले रामपाल महाराज याना सोडवण्यासाठी 2 नोव्हेंबरला मुंबईच्या आझाद मैदानात 15 ते 20 हजार लोकांचा मोर्चा आणला जाईल असा इशारा राष्ट्र समाज सेवा समितीचे उत्तम कदम यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.


2006 पासून पोलिस हरयाणा सरकार आणि न्याय पालिका रामपाल यांच्यावर अन्याय करत आहे. पोलिसांनी हरयाणा येथील आश्रमाला घेरून गोळीबार केला यामधे एका तरुणाचा मृत्यु झाला. या तरुणाच्या मृत्यूचा आरोपही रामपाल यांच्यावर लावण्यात आला आहे. संत कबीर यांनी जे सांगितले तेच रामपाल सांगत आहे. स्वामी दयानंद सरस्वती यानी वेदांचे चुकीचे अर्थ कसे लावले हे वैद्न्यानिक दृष्टया सिद्ध केले यामुले  रामपाल यांच्या विरोधात राग मनात ठेवून सूड बुद्धीने कारवाई करत असल्याचे वसंत साळगे व आजदेव ठाकुर यांनी सांगितले. रामपाल हे निर्दोष असल्याने या प्रकरणाची सीबीआय कडून चौकशी करावी अशी मागणी उत्तम कदम यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages