कोजागरीला पवई उद्यान परिसरात थांबण्यास पालिकेची मनाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोजागरीला पवई उद्यान परिसरात थांबण्यास पालिकेची मनाई

Share This

मुंबई : मुंबई महापालिकेच्या वतीने कोजागरी पौर्णिमेच्या कालावधीत पवई उद्यान आणि तलाव परिसरात नागरिकांना थांबण्यास तसेच उद्यानात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. २५, २६ आणि २७ आॅक्टोबर या दिवशी पवई उद्यान आणि तलाव क्षेत्रात नागरिकांना सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. सायंकाळी ५ ते सकाळी ७ या कालावधीत मात्र कोणालाही या परिसरात थांबू दिले जाणार नाही, तसेच प्रवेशही दिला जाणार नाही. याबाबतीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages