विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांचा 1, 2 रोजी संप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांचा 1, 2 रोजी संप

Share This
मुंबई- सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे विलीनीकरणाला आणि खासगीकरणाला विरोध करण्यासाठी ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज फेडरेशनने एक आणि दोन डिसेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यामध्ये भारतीय स्टेट बॅंकेसह पाच सहयोगी बॅंकांमधील कर्मचारी सहभागी होणार असून, या दिवशी बॅंकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

स्टेट बॅंक आणि तिच्या पाच सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारकडून घातला जात आहे. स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, स्टेट बॅंक ऑफ म्हैसूर, स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर, स्टेट बॅंक ऑफ पतियाळा आणि स्टेट बॅंक ऑफ बिकानेर आणि जयपूर या पाच सहयोगी बॅंकांवर स्टेट बॅंकेची मनुष्यबळ विभागाची धोरणे लादली जात आहेत. ज्यामुळे त्यांची स्वायत्तता धोक्‍यात आली असल्याचे फेडरेशनचे म्हणणे आहे. इंडियन बॅंक असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सबरोबर 25 मे रोजी झालेल्या 10 व्या द्विपक्षीय करारावर स्टेट बॅंकेतील एनसीबीईची स्वाक्षरी आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज फेडरेशनचीही स्वाक्षरी आहे. मात्र, असे असतानाही स्टेट बॅंकेचे व्यवस्थापन सेवा शर्ती बदलण्याचा प्रयत्न करत असून, यामुळे इतर पाच सहयोगी बॅंकांमधील कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा येणार आहे. या कृतीचा निषेध करण्यासाठी एक आणि दोन डिसेंबरला देशव्यापी संप केला जाणार असल्याचे फेडरेशनने म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages