महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्या

Share This

मुंबई / प्रतिनिधी 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण  दिनानिमित्त (६ डिसेंबर) आंबेडकरी अनुयायाची अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर ते सेवाग्राम -अजनी-नागपूर अशा  अधिकच्या सहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या या िनर्णयाने महापरिनिर्वाणदिनाला मुंबईतील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना या अधिकच्या रेल्वे गाड्यांमुळे मोठा िदलासा िमळाला आहे. 
खास करुन खान्देश, िवदर्भातील प्रवाशांना मध्य रेल्वेच्या या गाड्यांचा लाभ होणार आहे. ६ डिसेंबरला चैत्यभूीमवर देशभरातून लाखों आंबेडकरी अनुयायी येत असतात. त्यामध्ये महाराष्ट्रातील अनुयायांची संख्या मोठी असते. 

गाड्यांचा तपशील :
1. विशेष गाडी क्रमांक 01069 छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथून 6.12.2015 रोजी सायं 04.05 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 08:10 वाजता अजनी येथे पोहोचेल.
2. विशेष गाडी क्रमांक 01071 छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथून 6.12.2015 रोजी सायं. 6.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल.
3. विशेष गाडी क्रमांक.01073 दादर, मुंबई येथून 6/7.12.2015 मध्य रात्री 12.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी (7.12.2015) सायं 06.00 वाजता नागपूरला पोहोचेल.
4. विशेष गाडी क्रमांक 01075 छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई येथून 7.12.2015 रोजी दुपारी 12.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायं 03.30 वाजता नागपूरला पोहोचेल.
5. विशेष गाडी क्रमांक.01083 मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून 8.12.2015 रोजी सायं 06.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.10 वाजता नागपूरला पोहोचेल.
6. विशेष गाडी क्रमांक.01085 दादर, मुंबई येथून 7/8.12.2015 मध्य रात्री 12.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी (8.12.2015) सायं 06.00 वाजता नागपूरला पोहोचेल.

विशेष गाड्यांसाठी थांबे :
दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला,मुर्तजापूर, बडनेरा, धामणगाव,पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी.

मध्य रेल्वेने सोडलेल्या या सर्व सहा  विशेष गाड्या 12 जनरल सेकंड क्लासच्या असणार असून त्या सर्व अनारक्षित असतील असे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी कळवले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages