संविधान दिनानिमित्त कर्मचारी पाल्यांचा सत्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संविधान दिनानिमित्त कर्मचारी पाल्यांचा सत्कार

Share This

मुंबई /प्रतिनिधी - म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटने च्या वतीने ,गुलझारीला नंदा सभागृह, म्हाडा ,वांद्रे पूर्व येथे  संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर रोजी ,सकाळी ११ वा .१० वी ,१२ वीसह कोणत्याही शाखेचा पदवीधर झालेल्या व विशेष प्राविण्य मिळविलेल्या म्हाडा अधिकारी कर्मचारी यांच्या पाल्यांचा सत्कार तसेच शिवराय फुले शाहू आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आला आहे .

या कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस झेंडे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बी पी शिरवळकर तर प्रास्ताविक प्रधान कार्यवाह एस के भंडारे करणार आहेत. याप्रसंगी मुख्य दक्षता अधिकारी हेमंत नगराळे, मुख्य अधिकारी मुंबई मंडळ सुधीर खानापुरे ,मुख्य अधिकारी दुवपु मंडळाचे सुमंत भांगे ,मुख्य अभियंता मेधा शेंडे,मिलिंद पाटील,संजय लाड ,मुख्य अधिकारी मुंबई झोपडपट्टी मंडळाचे पी डी मलिकनेर,बी एन बास्टेवाड, कोंकण मंडळाचे विजय लहाने ,सह मुख्य अधिकारी चंद्रकांत डांगे ,विधी सल्लागार सी एम वाचासुंदर ,आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages